दर्शन देरे दे रे भगवंता दर्शन देरे दे रे भगवंता, किती अंत आता पाहसी अनंता माय पित्याची सेवा पुंडली काची भक्ति पाहिसी तू गोप्या कुंभाराची कैसे येडे ब्य्हावे तुझे कृपावंता दर्शन देरे... ऐकताच वाणी संत चोखोबाची साक्षात् प्रकटे मूर्ति विठलाची ऐसे दान देसी मुझ्या प्रिय संता दर्शन देरे... तूच जन्मदाता तूची विश्वकर्ता मनः शांत होइ तुझे गुण गाता हीच एक आशा पूरवी तू आता दर्शन देरे...