सामाजिक उपक्रम

मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल : श्री श्री 1008 श्री दादा दरबार विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात | खेडी घाट मध्ये एक मोठे चॅरिटेबल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बनवले आहे | आजूबाजूच्या परिसरात या प्रकारचे कोणतेही अन्य हॉस्पिटल नाही | तेथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांवर अत्यंत किफायतशीर किमतीत उपचार केले जातात | साधू, विशेषतः जे लोक नर्मदा परिक्रमा करतात त्यांचा विनामूल्य उपचार केला जातो | हॉस्पिटल ची वेबसाईट पण आहे

वैदिक पाठशाला: खेडी घाट मध्ये एक वैदिक पाठशाळा आहे ज्यात ब्राह्मणकुमारंना वेद, मंत्रोच्चारांसहीत वेदाचार्य बनण्याचे विशेष शिक्षण दिले जाते | यासाठी लागणारा खर्च दरबार द्वारे केला जातो |

कृषि: श्री श्री 1008 श्री दादा दरबार द्वारे लोकांना विनामूल्य भोजन दिले जाते | या उत्तम कार्यासाठी अन्नदानाचे मोठे योगदान दरबारच्या स्वामीत्वातल्या कृषी फार्मातून (शेतीतून) येते असते | जेथे श्री छोटे सरकार जी आणि अन्य भक्त सेवा करत असतात | शेतात गोशाळा सुद्धाआहे |