श्री छोटे सरकारजी

श्री बडे सरकारजींच्या सेवेत इंदोर दरबारात गुरुजी (श्री रामदासजी) होते | जे त्यांना चिलीम भरून द्यायचे | त्यांचे पाय अशक्त व अपंग असल्यामुळे लोक त्यांना आपल्या कडेवर घेऊन श्री बडे सरकारजींजवळ घेऊन जायचे परंतु ते थोड्या दूरच कडेवरून उतरून स्वतः सरकत सरकत श्री बडे सरकारजींजवळ जायचे आणि त्यांना चिलीम भरून द्यायची सेवा करायचे | गुरु सेवेत तन्मयतेने राहून श्रद्धेने गुरु चरणांवर त्यांची भक्ती होती म्हणून ते सदैव खाली मान घालून सेवा करायचे |
‘श्रीगुरु चरण सरोज रज,
निज मनु मुकुरु सुधारि।’
या चौपाई प्रमाणे त्यांची दृष्टी सदैव गुरु चरणांवर असायची |
एकदा चिलीम पीत असताना श्री बडे सरकारजींनी गुरुजींना सांगितले की, “क्यों रगडता है, दिल्ली जा, दिल्ली दरबार चले जा” | (का घसडतो? दिल्ली जा, दिल्ली दरबार चालला जा) तेथून बाहेर आल्यावर गुरुजींनी एका भक्ताला सांगितले की, “मुझे स्टेशनपर लेकर चलो और दिल्ली के ट्रेन में बैठा दो” | (मला स्टेशनवर घेऊन चला आणि दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसवून द्या) ते ठेंगणे व हलक्या वजनाचे होते आणि अपंग असल्यामुळे एका भक्ताने त्यांना उचलून स्टेशनवर नेले आणि दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसवून दिले | तेथून ते लहान मार्गाने रतलाम पर्यंत गेले | रतलामला एका हमालाला सांगितले की, “हमे दिल्ली की बडी लाईन की ट्रेन मे बैठा दो” | (मला दिल्लीच्या मोठ्या मार्गाच्या ट्रेनमध्ये बसवून द्या) कारण ते अपंग होते | त्यामुळे त्यांना तिकीटाबद्दल कोणी विचारले नाही व त्यांच्याजवळ तिकिटासाठी पैसे सुद्धा नव्हते आणि ते दिल्लीला पोहोचले | जेव्हा ट्रेन दिल्लीला पोहोचली आणि सर्व डबे रिकामे होऊन गेले तेव्हा एका हमालाने त्यांना एकटेच बसलेले बघून विचारले की ,”बाबा तुम्ही येथे का बसले आहात?” गुरुजी म्हणाले, “हमे दिल्ली जाना है” |(मला दिल्ली जायचे आहे) तेव्हा हमाल म्हणाला की, “दिल्ली येवून गेली आणि आता गाडी यार्ड मध्ये जात आहे | तुम्हाला उतरून देऊ का?” गुरुजींनी म्हटले, “उतार दो” | (उतरवून द्या) हमालाने त्यांना प्लॅटफॉर्मवर उतरवून दिले | तेथेच गुरुजींनी दादा नाम सुरू करून दिले | त्याच हमालाने काही वेळानंतर गुरुजींना तेथेच बसलेले पाहिले | तेव्हा त्याने विचारले, “बाबा तुम्ही येथेच बसले आहात तुम्हाला कुठे जायचे आहे?” तेव्हा गुरुजी म्हणाले, “हमे दिल्ली जाना है” | (मला दिल्ली जायचे आहे) हमाल चिडून म्हणाला की, “दिल्ली हीच आहे अजून कोणती दिल्ली? चला मी तुम्हाला बाहेर घेऊन जातो” असे सांगून त्यांनी गुरुजींना उचलून जुन्या दिल्ली च्या स्टेशन वर बाहेर बसवून दिले |
स्टेशनच्या बाहेर जाऊन हमालाने गुरूजींना विचारले की, “सांगा तुम्हाला कुठे जायचे आहे? तशी मी रिक्षा करून देतो” | गुरुजी म्हणाले, “मुझे पता नही मुझे गुरुमहाराज ने कहाँ दिल्ली चले जाओ तो मै यहाँ आ गया” |(मला माहित नाही |मला गुरु महाराजांनी सांगितले की, ‘दिल्ली चालला जा तर मी येथे येऊन गेला) हमाल पुन्हा चिडून म्हणाला की, “अरे दिल्लीत कुठे जायचे हे तर सांगा, मी रिक्षा करून देतो” | गुरुजी म्हणाले, “मुझे तो नही पता”( मला माहित नाही) आणि हमाल बडबडत गुरुजींना तेथे एकट्यांना सोडून निघून गेला | तेथे एक व्यक्ती आपल्या ठेल्यावर थंड गोड ऊसाचे गंडेरे विकायचा जेव्हा त्याने बघितले की संध्याकाळ झाली तरी हा बाबा येथेच बसला आहे | तेव्हा त्याने गुरुजींना विचारले की, “बाबा आपको कहा जाना है?” गुरुजी बोलले “मुझे पता नही| मुझे गुरुमहाराज ने कहाँ दिल्ली चले जाओ तो मै दिल्ली आ गया” | (माझ्या गुरूंनी मला सांगितले की दिल्लीला जा तर मी दिल्लीला येऊन गेलो) गंडेरीवाल्याने गुरुजींना एकटे अपंग बघून त्यांना आपल्या जवळच्या गंडेऱ्या खायला दिल्या आणि पुन्हा आपल्या कामात लागून गेला जेव्हा रात्री घरी जायची वेळ झाली तेव्हा त्याने पुन्हा गुरुजींना विचारले की, “बाबा तुम्हाला कुठे जायचे? तुम्हाला कोणी घ्यायला येणार आहे का?” तर गुरुजी म्हणाले, “मुझे पता नही” (मला माहित नाही) तेव्हा त्या माणसाने सांगितले की, “चला असं करा माझ्या ठेल्यावर बसून जा मी तुम्हाला घेऊन जातो” | मध्ये रस्त्यात पुन्हा विचारले की, “मी तुम्हाला कुठे घेऊन जाऊ?” तर तेच उत्तर मिळाल्याने गंडेरी वाल्याने विचार केला की बाबा रात्री एकटे कुठे जातील | त्याने गुरुजींना विचारले की, “माझ्या घरी चलणार का?” गुरुजी त्याला म्हणाले, “चलो”(चला) तेव्हा तो त्यांना आपल्या घरी घेऊन आला |
रात्री घरी पोहोचल्यावर गंडेरी वाल्याच्या पत्नीने जो स्वयंपाक केला होता तो सर्वांनी सेवन केला गुरुजींनाही दिला | गुरुजी दादा नाम, भजन करत करत झोपले | सकाळी गंडेरी वाल्याने स्नान केले व गुरुजींना सुध्दा स्नान करविले | एखाद्या अनोळखी व्यक्तीला घरात एकटे राहू द्यायची इच्छा होत नव्हती म्हणून गंडेरी वाल्याने गुरुजींना विचारले की, “मी गंडेरी विकायला जात आहे | तुम्हाला कुठे सोडू?” गुरुजींनी पुन्हा म्हटले की,”मुझे पता नही” (मला माहित नाही) तेव्हा त्याने सांगितले की, “तुम्ही पण माझ्यासोबत गंडेरी विकायला चला” आणि गुरुजींना ठेल्यावर बसवून आपल्या सोबत घेऊन गेला | गुरुजी त्याच्या सोबत गंडेरी विकू लागले | कधी गुरुजी गंडेरी सोलायचे आणि तो विकायचा तर कधी तो सोलायचा आणि गुरुजी विकायचे | तो जोर जोरात ओरडायचा, “मिठी ठंडी गंडेरी ले लो” | तर गुरुजी पण तसेच बोलायचे | त्या दिवशी त्याच्या गंडेरी दुप्पट विकल्या गेल्या | असे करत करत दोन-तीन दिवस निघून गेले | त्या दरम्यान बबन नावाच्या गंडेरीवाल्याला गुरुजींवर विश्वास बसला की हे संत महात्मा आहे | त्याने गुरूजींना सांगितले की, “तुम्ही घरीच रहा | मी गंडेरी विकून येतो” | दररोज रात्री झोपण्याआधी गुरुजी दादाजींचे भजन म्हणायचे आणि हळूहळू जिथपर्यंत गुरुजींचा आवाज पोहोचायचा तेथून लोक त्यांच्या भजनाने आकर्षित होऊन तिथे यायचे | ते बबनला विचारायचे की, “हा अपंग कोण आहे? जो खूप सुंदर भजन गातो आणि त्यांना कुठून घेऊन आलास?” तेव्हा बबनने पूर्ण गोष्ट सांगितली | हळूहळू भजन ऐकण्याऱ्यांची संख्या वाढत गेली | गुरुजींचे भक्त बनत गेले | त्यातील बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि त्यांचा विश्वास गुरुजींवर दृढ होत गेला |
एकदा अमावास्येला गुरुजींनी बबनला सांगितले की, “मुझे जमुना नदी पर लेकर चल, स्नान करना है” | (मला यमुना नदीवर घेऊन चल, स्नान करायचे आहे) बबनने त्यांना आपल्या सायकलच्या मागे बसवले आणि तेथे घेऊन गेला | स्नान केल्यानंतर परततांना गुरुजींनी त्याला एक जागा दाखवली आणि म्हणाले की, “हमे यही पे उतार दो” | (मला येथे उतरवून दे) उतरल्यानंतर तेथेच बसून गेले आणि बबनला म्हणाले की, “तू जा” | (तुम्ही जा) तेव्हा बबन म्हणाला की, “तुम्ही चला” | गुरूजी म्हणाले, “हमारा स्थान आ गया अब तुम जाओ और आप यहाँ आते जाते रहो” |(आमचं स्थान येऊन गेलं आहे | आता तुम्ही जा आणि येत-जात राहा)मग ते तेथेच राहून भजन करू लागले | त्या स्थानावर आज दिल्ली दरबार स्थापित आहे |
त्यावेळी ही जागा ओबड-धोबड होती | तेथे रिंग रोड बनवण्याचे काम सुरू झाले होते आणि बरेच घर-दुकाने मोडली होती | गुरुजींचे खूप भक्त बनले होते त्यात विशेषतः पोलीस लोक जास्त होते | काही पोलीसवाले सस्पेंड झाल्यावर गुरुजींकडे यायचे | गुरुजी त्यांच्याकडून रिंगरोडचे काम करून घ्यायचे | सेवा केल्यावर त्यांना पुन्हा कामावर घेतले जायचे | एक चमत्कारी बाबा आहे जे आपले बिघडलेले काम करून देतात अशी बातमी पोलिसांमध्ये पसरली | त्यामुळे भक्तांमध्ये पोलिसांची संख्या वाढत गेली |
या भक्तांमध्ये एक भक्त होता भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ | राजेंद्र प्रसादजींचा ड्रायव्हर | त्याने एकदा गुरुजींना सांगितले की त्याच्या साहेबांना म्हणजे राजेंद्रप्रसादजींना दमा आहे | त्यामुळे ते खूप बैचेन असतात | गुरुजींनी साहेबांना खायला ड्रायव्हर जवळ एका फूलाची पाकळी दिली | राजेंद्रप्रसाद यांच्यासोबत त्यांची बहीणही राष्ट्रपतीभवनात राहत होती | ड्रायव्हरने फुलांच्या पाकळीचा प्रसाद त्या बहिणीजवळ दिला आणि गुरूजींबद्दल तिला सांगितले | डॉक्टर राजेंद्र प्रसादजींच्या बहिणीने त्यांना फूलाची पाकळी खाऊ घातली तर त्यांना एकदम बरे वाटले | याप्रमाणे दोन दिवसांपर्यंत तो ड्रायव्हर गुरुजींकडून फूल पाकळी घेऊन यायचा | तिचे सेवन केल्यामुळे डॉ | राजेंद्रजींना आराम वाटायचा | तिसऱ्या दिवशी त्यांची बहीण स्वतः ड्रायव्हर सोबत गुरुजींजवळ दर्शनासाठी आली आणि त्यांना विनंती केली की माझा भाऊ सरकारी बंधनांमुळे येथे आपल्या दर्शनास येऊ शकत नाही म्हणून गुरूजी आपण आमच्या सोबत राष्ट्रपती भवनात चला | गुरुजींनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्यांच्यासोबत गेले | याप्रमाणे त्यांचे राष्ट्रपती भवनात येणे-जाणे सुरू राहिले | आणि बरेच दिवस त्यांच्या आग्रहास्तव गुरुजी तेथे थांबूनही जायचे | तेव्हा त्यांना भेटण्यासाठी लोक येऊ लागले | त्या लोकांमधील काही लोक गुरुजींसोबत चिलीम प्यायचे | त्यामुळे भवनातील काही लोकांनी नाराजी दर्शवली | डाॅ | राजेंद्र प्रसाद यांच्या बहिणीने गुरुजींना सांगितले की आमचा चिलीम पिण्यास काही विरोध नाही पण ते बघून इतर लोकही येथे चिलीम पितात आणि हे भवनाच्या नियमांच्या विरुद्ध आहे | तेव्हापासून गुरुजी कधीही तेथे थांबले नाही, दर्शन देऊन निघून जायचे |
श्री बडे सरकारजींची वाणी “तू दिल्ली चले जा, दिल्ली दरबार चले जा” |( तू दिल्ली चालला जा दिल्ली दरबार जा) सत्य झाली आणि आजही लाखोंच्या संख्येत दिल्लीत भक्त दर्शनाला येतात आणि तेथेच गुरुजींची समाधी आहे |

1965 मध्ये तीन वर्षांचा मुलगा इंदौर दरबारात श्री बडे सरकारजींसोबत खेळत राहायचा | श्री बडे सरकारजींना या मुलाविषयी विशेष आकर्षण होते | त्यांनी त्याला आपले करून घेतले | त्यांनी त्या मुलाचे नाव श्री छोटे सरकार ठेवले | त्यांना औपचारिक आणि धार्मिक शिक्षण दिले |
1966 मध्ये श्री बडे सरकारजींनी श्री छोटे सरकारजींना दिल्लीत आणले आणि गुरूजींच्या भक्तांना सांगितले की, “उनके गुरूने फिर से जनम ले लिया है, और श्री छोटे सरकारजी ही उनके गुरु है” |(त्यांच्या गुरूंनी पुन्हा जन्म घेतला आहे आणि श्री छोटे सरकारजीच गुरुजी आहेत) गुरु रामदास महाराज आपल्या शिष्यांना सांगायचे की “उनके अगले जनम मे वे इतनी तेजी से दौडेंगे की कोई भी उन्हे पकड नही पायेगा” | (पुढच्या जन्मात ते इतक्या वेगाने पळतील की कोणीही त्यांना पकडू शकणार नाही )आणि हे सुध्दा सांगितले की, “अगले जनम मे एक बच्चे के रूप मे वे कई चमत्कार करेंगे” | (पुढील जन्मात एका बाळाच्या रूपात अनेक चमत्कार करेन) श्री छोटे सरकारजींनी बाळ रूपात खरंच खूप चमत्कार केलेत | एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या शिष्याच्या कानात काही अशा गोष्टी सांगितल्या की ज्या इतरांना माहीत नसायच्या | एकदा बाळाच्या रूपात श्री छोटे सरकारजी श्री गुरु रामदासजी महाराजांच्या समाधीवर उभे राहून म्हणू लागले की,” जो अंदर है वो ही बाहर है” | (जो आत आहे तोच बाहेर आहे) अशा घटनांनंतर भक्तांचा पूर्ण विश्वास बसला की श्री छोटे सरकारजींच त्यांचे गुरुजी आहेत आणि पूर्ण निष्ठेने श्री छोटे सरकारजींच्या सेवेत लागून गेले |
श्री छोटे सरकारजी पूजा-पाठ, हवन, भजन आणि अन्य वैदिक अनुष्ठानांच्या माध्यमाने लोकांना धर्माच्या मार्गावर चालायला, शिस्तीने वागायला आणि गुरूमर्यादा पाळायला शिकवतात आणि नवीन युवा पिढीला संस्कारीत बनवतात |
गुरु कुम्हार शिष कुंभ है, गढ़ी गढ़ी काढे खोट
अंतर हाथ संहार दे, बाहेर चाहै चोट |
गुरू कुंभाराप्रमाणे असतात आणि शिष्य मातीच्या घड्याप्रमाणे | ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या घड्याला एका हाताने बाहेरून थोपटत असतो आणि दुसऱ्या हाताने आतून आधार देत असतो | त्याच प्रमाणे श्री छोटे सरकारजी सुद्धा भक्तांना बाहेरून थोपटत असले तरी आतून त्यांना सुंदर-सुदृढ आकार देतात | श्री छोटे सरकारजी कडक शिस्तीचे असले तरीही भक्तांविषयी त्यांच्या मनात प्रेमभावना असून ते भक्तांच्या विकारांना दूर करत असतात |
श्री छोटे सरकारजी फक्त गुरूच नाही तर ते आमचे माता-पिता सुध्दा आहेत | तेच पालनहार आहेत | ते केवळ सन्मार्गच दाखवत नाही तर आमचे पालन-पोषण करून त्यावर चालायलाही शिकवतात | म्हणूनच म्हणतात,
‘दादाजी आपकी दया से,
मेरा सब काम हो रहा है|
करते हो दादाजी आप,
और नाम मेरा हो रहा है|’
असे गुरू ज्यांचा महिमा अपरंपार आहे | त्यांचे वर्णन शब्दात करू शकत नाही |
जरी आपण पूर्ण पृथ्वीचा कागद बनवला, संपूर्ण जंगलातल्या लाकडाची लेखणी बनवली, साता-समुद्राची शाई बनवली,तरीसुद्धा आपण गुरूंचा महिमा वर्णन करू शकत नाही |