श्री बडे सरकारजी (श्रीरामदयालजी महाराज) राजस्थानच्या एका राजेशाही परिवारातील होते | त्यांच्या सावत्र आईला त्यांच्याबद्दल ईर्ष्या होती | आपल्या सख्ख्या मुलासाठी राजगादी मिळावी अशी तिची इच्छा होती | एकदा तिने श्री बडे सरकारजींना टोला मारला की ‘गुरुबिन नगूरा होता है, गुरु होना चाहिए|’ हे ऐकून श्री बडे सरकारजी गुरूंच्या शोधार्थ घरातून निघाले | ते अनेक संत, महात्मा, आचार्यांजवळ गेले पण कोणातही आपले गुरु दिसले नाही | एके दिवशी श्री बडे सरकारजी बद्रीनाथ मंदिरात पोहोचले तर त्यांनी आकाशवाणी ऐकली “तेरा गुरू यहा हो तो ढूंड लेना, मै तो नर्मदा खंड मे हु |”(तुझे गुरू इथे असतील तर शोधून घे, मी तर नर्मदा खंडात आहे ) ते राजस्थानचे असल्यामुळे त्यांना नर्मदा खंड माहीत नव्हता | एका साधूने त्यांना सांगितले की नर्मदा खंड तर नर्मदा तटाला म्हणतात आणि ते येथून खूप दूर आहे | श्री बडे सरकारजी त्याच वेळी बद्रीनाथहून पायी जबलपूरच्या नर्मदा किनारी पोहोचले | त्यांनी नर्मदेत स्नान व पूजा करून तेथे चिलीम पीत बसलेल्या साधूला आपल्या आकाशवाणी बद्दल सांगितले | तेव्हा साधू म्हणाले नर्मदाखंड तर हेच आहे नर्मदेच्या उत्तरी आणि दक्षिणी तट दोघांना नर्मदा खंड म्हणतात | याचा उल्लेख स्कन्द पुराणाच्या रेवा खंडात आहे | त्यांनी श्रीबडे सरकारजींना स्कंदपुराण वाचण्यास दिले | श्री बडे सरकारजी म्हणाले मी हे वाचले आहे | तेव्हा साधू म्हणाले की तुम्ही नर्मदा परिक्रमा सुरू करून द्या | त्याप्रमाणे श्री बडे सरकारजी परिक्रमा करत करत अमरकंटकहून साईखेडा येथे पोहोचले |
श्री बडे सरकरजींनी साईखेड्यात श्री बडे दादाजी महाराजांना त्यांच्या टोळीत आपल्या भक्तांना शिव्या देतांना आणि डंडा मारताना दुरूनच बघितले | तेवढ्यात पंगत बसली | श्री बडे सरकारजींनी आपला हात प्रसाद घेण्यासाठी पुढे केला पण कोणीही त्यांना प्रसाद दिला नाही | जेव्हा साधुंनी प्रसाद घेऊन आपले केळीचे पान पटकले तर श्री बडे सरकारजींनी एका पानावर आपला हात फिरवून तो हात पोटाला लावला | जेव्हा श्री बडे दादाजींची दृष्टी त्यांच्यावर पडली तर ते म्हणाले ‘यह मोडा कोन है’ आणि त्यांना बोलावून म्हणाले “मै तो प्रशादी भक्त था” , तू प्रशादी भक्त कहॉ से आ गया?” | (मी तर प्रसादी भक्त होता, तु प्रसादी भक्त कुठून आला?) ही गोष्ट त्यांनी दोनदा उच्चारली आणि म्हणाले “अच्छा राजस्थानी हो, अच्छा मेजर हो, अच्छा राजकुमार हो|”(बरं राजस्थानी आहे, बरं मेजर आहे, बरं राजकुमार आहे ) श्री बडे सरकारजी हात जोडून उभे राहिले तर श्री बडे दादाजी म्हणाले “अच्छा अब वो फौज छोडो और हमारी फौज मे शामील हो जाओ|” (बरं आता ती फौज सोडून आमच्या फौजेत सामील होऊन जा)
गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरू तथा
पापं तापंच् दैन्यंच हरती गुरू समागमा
गंगा पापाचे हरण करते, चंद्रमा तापाचे हरण करते | परंतु कल्पतरु दरिद्रीचे हरण करते | पण पाप-ताप आणि दैन्य गुरु संगतीने हरण होतात | नंतर श्री बडे सरकारजींना श्री बडे दादाजींसारखे गुरु लाभल्याने ते त्यांच्या सेवेत लागून गेले |
एके दिवशी श्री बडे दादाजींनी त्यांना सांगितले की “हमारे छोटे( श्रीछोटे दादाजी) की सेवा में रहो” (आमच्या श्रीछोटे दादाजींच्या सेवेत रहा )तेव्हापासून श्रीबडे सरकारजी श्री छोटे दादाजींच्या सेवेत राहू लागले |ते त्यांच्या धुनीचे लाकुड ठीक करायचे हवनासाठी बाहेरून लाकूड आणायचे , त्यांना स्नान घालायचे वैगरे | त्यांनी श्री बडे दादाजी आणि श्री छोटे दादाजींसोबत साईखेडा सोडले आणि १९३० मध्ये छीपानेर , बागली , उज्जेन , इंदोर , नावघाट खेडी ( बडवाह) , दाउदवाह आणि खंडव्याची यात्रा केली आणि १९३० मध्ये श्री बडे दादाजींनी खंडव्यात समाधी घेतली |
सन १९४२ मध्ये कुंभमेळ्यात श्रीछोटे दादाजींनी समाधी घेतली | श्रीछोटे दादाजींनी समाधी घेतल्यानंतर बरेचसे भक्त आपला सामान बांधून आता श्री छोटे दादाजींनी तर समाधी घेऊन घेतली आहे असे म्हणून तेथून निघून गेले परंतु श्री बडे सरकारजी (इंदोर सरकार) आणि शिष्य मिळून श्रीछोटे दादाजींच्या पार्थिवाला खंडव्याला नेण्याच्या तयारीत असताना कुंभमेळ्यात आलेले मोठे मोठे संत आणि महंतांनी त्यांचा रस्ता अडवला आणि हट्ट करायला लागले की श्री छोटे दादाजींनी प्रयागराज सारख्या पवित्र जागेवर समाधी घेतली आहे तर त्यांची येथेच जलसमाधी झाली पाहिजे | तेव्हा श्री बडे सरकारजींनी श्रीछोटे दादाजींचे भक्त विश्वनाथ चौधरींना बोलावले | त्यांच्या बंगल्यात श्री छोटे दादाजी थांबले होते | त्यांनी सर्वांसमोर विश्वनाथला आठवण करून दिली की श्री छोटे दादाजींनी काही दिवसांपूर्वी त्यांना सांगितले होते की आता खंडव्याला जाण्याची तयारी करा | याचा अर्थ श्री छोटे दादाजींची इच्छा होती की खंडव्याला जावे तेव्हा विश्वनाथ चौधरींनी दादाजींच्या पार्थिवाला नेण्यासाठी एक पेटी तयार केली आणि लवकरच काशी एक्सप्रेस ट्रेनला एक डबा लावला | जेव्हा श्री बडे सरकारजींनी आणि दुसऱ्या भक्तांनी हे बघितले की शेवटचा डबा मालगाडीचा आहे आणि त्यातून जाण्याची तयारी केली आहे | हे बघून त्यांना खूप दुःख झाले | की श्री छोटे दादाजींसारख्या महान सद्गुरूंना एका साधारण मालगाडीच्या डब्यातून खंडव्यास घेऊन जाण्याची तयारी केली आहे | पण वेळेअभावी दुसरा इलाजच नव्हता | विश्वनाथ चौधरींनी माफी मागितली | घाईत त्यांच्याकडून चूक झाली होती | श्री बडे सरकारजी म्हणाले की “तेरे से गलती हो गयी ,अब तू जान” (तुझ्या कडून चूक झाली, आता तू तुझ बघ) आणि ते राजानंदजी , स्वामी चरणानंदजी , वीरेंदर बहादुर सिंग, पहाडी बाबा आणि भक्तांसह डब्यात दादानाम म्हणत श्री छोटे दादाजींना खंडव्याला घेऊन आले |
खंडव्याला आणल्यानंतर भक्तांनी श्रीछोटे दादाजींची समाधी श्री बडे दादाजींच्या समाधीजवळ बनवली | त्यांना जे जे व्यंजन आवडत होते जसे मालपुवा, खीर, दाल भात,भाकरीचे नैवेद्द लावून वस्त्र ठेवले | संत समाधीत मिठाचा वापर करीत नाही म्हणून खंडव्यातील सर्व कापूर खरेदी केले परंतु हे पुरेसे नसल्याने इंदोरहून पण कापूर मागवले एकूण २१ कीलो कापुर श्री छोटे दादाजींच्या समाधीसाठी लागले |
श्री बडे सरकारजींनी बरेच वर्ष तेथे राहून दोन्ही समाधींची सेवा, पूजा-पाठ आणि नियमांचे पालन केले | या दरम्यान तेथे श्रीबडे दादाजींचे उत्तराधिकारी बनण्यासाठी शिष्यांमध्ये मतभेद सुरू झाले आणि तेथील वातावरण खराब झाले | त्यामुळे श्री बडे सरकारजी त्रासून गेले | स्वामी चरणानंदजी स्वतःला श्री बडे दादाजींचा उत्तराधिकारी घोषित करू इच्छित होते | पण दुसऱ्या लोकांना हे मान्य नव्हते | ह्या वादविवादाने त्रासून 1948 मध्ये श्री बडे सरकारजी महाराज पायीच रेल्वेच्या रुळाजवळून इंदोरला पोहोचले |
सन १९१९ मध्ये श्री बडे दादाजी आणि श्री छोटे दादाजी इंदोरला आले तेव्हा छत्रीबाग परिसरात श्री बडे दादाजींनी आपला रथ जेथे लावला होता तेथे आज श्री वेंकटेश्वर मंदिर आहे आणि श्री छोटे दादाजींनी तेथूनच काही दुर धुनी रमवली | ह्याच जागी श्री बडे सरकारजींनी पुन्हा धुनी प्रज्वलित केली | खंडव्याच्या समाधीची सेवा आणि बाकी कार्यासाठी ते येत-जात राहिले |
श्री बडे सरकारजींची ह्या दरम्यान रेल्वे स्टेशनवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री भगवंतराव मंडलोई यांच्याशी भेट झाली | त्यांनी खंडवा दरबारातील भांडणाबद्दल त्यांना सांगितले | मुख्यमंत्र्यांनी श्री बडे सरकारजींना त्यांची इच्छा विचारली आणि सन १९६२ ला दरबाराच्या ट्रस्टची निर्मिती केली | श्री बडे सरकारजींनी ट्रस्टमध्ये श्री स्वामीचरणानंदांना घेण्याचे सांगितले कारण ते ब्राह्मण होते | पण ही गोष्ट इतर ट्रस्टींना आवडली नाही आणि तेव्हापासून ते श्री बडे सरकारजींची घृणा करू लागले | ट्रस्टमध्ये श्रीस्वामी चरणानंदजी आल्यानंतर तेसुद्धा श्री बडे सरकारजींचा द्वेष करू लागले | त्यांनी श्री बडे सरकारजींवर चुकीचे आरोप लावले | एके दिवशी श्री बडे सरकारजींनी त्यांना विचारले की, “तुम्हाला काय हवे आहे?” तेव्हा श्री स्वामी चरणानंदजी म्हणाले की, “जोपर्यंत तुम्ही येथे राहाल तोपर्यंत मला कोणी मानणार नाही |” तेव्हा श्री बडे सरकारजी म्हणाले की, “अजून काही? बस एवढेच?” आणि असे म्हणून ते खंडवा सोडून इंदोरला आले | येथे येऊन त्यांनी धुनी मैय्याच्या समोर केवळ पाणी पिऊन १२ वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या केली | भक्तगण वस्त्र , फळं वैगरे आणायचे तर त्यांना ते धुनीत हवन करून द्यायचे किंवा लोकांना वाटून द्यायचे | तेथे आज दादा दरबार स्थापित आहे | प्रत्येक गुरुपौर्णिमा, दसरा आणि इतर सणांना ते खंडव्याला जायचे | इंदोर राज्याचे तुकोजीराव होळकर , जयपूरचे महाराज जयसिंह , सोहावल राज्याचे वीरेंद्र बहादूर सिंग आणि बऱ्याच राजांनी त्यांना आपले आध्यात्मिक गुरु बनवले |
18 फेब्रुवारी 1989 ला श्री बडे सरकारजी १०५ वर्षाचे असताना ब्रम्हलीन झाले | त्यांचे उत्तराधिकारी श्री छोटे सरकारजी महाराजांनी त्यांची समाधी इंदोर दरबारात बनवली |