यात्रा

दरवर्षी श्री श्री 1008 श्री छोटे सरकार जी भारतातील ग्रामीण भागात गावोगावी दादाजींच्या भक्तांकडे
जातात | ते जिथं जातात त्या त्या ठिकाणी उत्सवासारखे वातावरण निर्माण होते | भक्तगण दादाजी महाराजांच्या भजनात तल्लीन होऊन जातात | त्या सोबतच वेदपाठ, मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण मंगलमय होते | गुरूमहाराज राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगालच्या अनेक गावांना भेट देतात | श्री श्री 1008 श्री छोटे सरकारजी भारतातील आणि संपूर्ण जगातील विविध शहरांमध्ये आपल्या शिष्यांना दर्शन पण देतात | श्री श्री 1008 श्री छोटे सरकार जी आपल्या शिष्यांना कैलास नाथ, बद्रीनाथ, त्रंबकेश्वर, घृष्णेश्वर, अन्य ज्योतिर्लिंग आणि भारतातील विभिन्न पवित्र स्थानांवरपण आपल्या सोबत घेऊन जातात |