दादा दरबार

श्री श्री १००८ श्री दादा दरबार ही सनातन हिंदु धार्मिक संस्था असून येथे दोन देवतांची पूजा केली जाते | श्री बडे दादाजी ज्यांना भगवान शंकर आणि श्री छोटे दादाजी ज्यांना भगवान विष्णूचे अवतार मानले जाते | हे एक असे स्थान आहे की जेथे १९ व्या शतकाच्या अखेर पासून गुरु-शिष्य परंपरा सुरू आहे | आता श्री छोटे सरकारजी महाराज यांचे नेतृत्व आहे | येथे भक्त आपल्या गुरूंवर भक्तीचा, पूजेचा व प्रेमाचा वर्षाव करतात आणि भक्ती व सेवा-योग मार्गावर चालतात |
सध्या भारतात १४ दरबार असे आहेत की जेथे छोटे सरकारजींच्या मार्गदर्शनाखाली भक्त दादाजींची पूजा करून विविध उत्सव आणि सण साजरे करतात |