दरबाराच्या चालीरीती

[Google_Maps_WD id=2 map=2]

श्री छोटे सरकारजी के द्वारा बनाये हुए दरबार

अन्य दादाजी भक्तों के द्वारा बनाये हुए दरबार

 दादा दरबाराच्या चालीरीती

प्रत्येक दादा दरबाराची सुरुवात सकाळी 5:00/5:30 वाजता होते | उन्हाळा आणि हिवाळा यातील बदलत्या हवामानाला अनुसरून दोन वेळा दिल्या आहेत |
पहाटे मंदिराचे दार उघडले जाते | श्री दादाजी आणि श्री हरिहरजींचे स्नान आणि शृंगार होत असताना वेंकट स्तोत्र, रुद्रीपाठ, संहिता अध्याय, दुर्गा सप्तशती, विष्णुसहस्त्रनाम आणि गणपती अथर्वशीर्षाचे पाठ होतात |
7:30/8:00 वाजता शिव पंचाक्षरस्तोत्र, शिवमानसपूजा, नर्मदेची आरती, रूद्राष्टक, नर्मदाष्टक, पुन्हा रूद्राष्टक, दादाष्टक, दादानाम आणि शेवटी ‘रक्षा करो हमारी श्री दादाजी धुनीवाले’ हे म्हटले जाते |
मंदिरात नैवेद्य दाखवल्यानंतर कलेवा (नाश्ता) प्रसादासाठी घंटी वाजते | श्री छोटे सरकारजी सुद्धा भक्तांसोबत बसून कलेवा प्रसाद घेतात |
9:30/10:00 वाजता सामूहिक रुपाने भजन-कीर्तन, हनुमान चालीसा, रूद्राष्टक आणि शेवटी तीन वेळा ‘बोलो रे बेलिया अमृतवाणी, हर हर हर महादेव’ आणि ‘जय श्री दादाजी की’ चा जयघोष होतो |
12:00/12:30 वाजता मंदिरात नैवेद्य दाखवतात |
दुपारी 4:00/4:30 वाजेपासून भजन-कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होतो | यात श्री छोटे सरकारजी आणि भक्तगण दादाजींच्या नावाचा आनंद घेतात | भजनानंतर हनुमान चालीसा, शिव महिमा, शिवतांडव आणि शेवटी तीन वेळा ‘बोलो रे बेलिया अमृतवाणी, हर हर हर महादेव’ आणि ‘जय श्री दादाजी की’ चा जयघोष होतो |
दर गुरुवारी संध्याकाळी सत्यनारायणाची कथा वाचली जाते आणि मंदिरात नैवेद्य दाखवले जाते |
संध्याकाळी 7:30/8:00 वाजता शिवपंचाक्षरस्तोत्र, शिवमानसपूजा, नर्मदेची आरती, रूद्राष्टक, नर्मदाष्टक, पुन्हा रुद्राष्टक, दादाष्टक, दादानाम आणि शेवटी ‘रक्षा करो हमारी श्री दादाजी धुनिवाले’ असे म्हटले जाते |
रात्री 9:30/10 |00 वाजता प्रसाद वाटला जातो आणि मंदिराचे द्वार बंद केले जातात |
दादादरबारात केले जाणारे सर्व कर्मकांड, कथा आणि मंत्रोच्चारण हे दादादरबाराच्या परंपरेनुसार श्री | दादाजी आणि श्री | हरिहरजींच्या श्रवणासाठी केले जाते | दादाजी सदैव आमच्या अंग-संग आहेत अशी शिकवण आणि प्रेरणा श्री | छोटे सरकारजी सर्व भक्तांना देतात | म्हणूनच आपण देश-विदेशात, घरात किंवा कोठेही असो दादाजींची स्तुती करायला पाहिजे |