विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ,हरी ओम विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला    !!धॄ!!

  रूक्मिणीकांत विठ्ठला , पंढरीनाथ विठ्ठला
  राधा शाम विठ्ठला , सिताराम विठ्ठला
  द्वारीकेचा राजा तू , पंढरीच्या पाटला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला     !!१!!

  रूक्मिणी साठी आला तू , पांडूरंग विठ्ठला
  गोपाळपुरी , गोपाळा सवे , रमलासिबा विठ्ठला
  गायी चाराया नाही बा , दमला तू विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला     !!२!!


  दिंडीरवनी महातिर्थ , लोहदंड विठ्ठला
  पाण्याचा झरा तिथे , वाहतोया विठ्ठला
  रंम्य स्थळ पाहूनीया , आमुलीक विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला     !!३!!

  माय बाप घेवूनी आला , पुंडलिक विठ्ठला
  मातापित्याच्या सेवेमध्ये , पुंडलिक दंगला,
  पांडूरंग भेटायाला, आला पुंडलिकाला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला     !!४!!

  सेवा करतो आई बापाची , सोहळा  हा  पाहिला
  विट फेकली त्या विटेवर , विठ्ठल उभा राहिला
  पंढरी नगरी जमली तेंव्हा , पाहावया श्रीहरीला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला     !!५!!

  भक्त जन होती गोळा , पंढरीच्या वारीला
  भक्तांच्या या रक्षणाला , धावला तू विठ्ठला
  संत नामदेवा संग , जेवला तू विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला , हरी ओम विठ्ठला     !!६!!

  गोपाळपुरी जनाईसाठी , गेलासीबा विठ्ठला
  जनाईसवे दळण तू , दळीले बा विठ्ठला
  ओव्या ऐकून जनाईच्या , दंगला श्रीविठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला     !!७!!

  अलंकार विसरुनीया , गेलासिबा विठ्ठला
  चोरीचा तो आळ जनीवर , आणीला बा विठ्ठला
  सुळावरी देता धावूनीया , गेलासिबा विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला     !!८!!

  आषाढीच्या एकादशीला , दिंडी चालली पंढरीला
  सखुबाई बोले सासुबाईला , जावू चला पंढरीला 
  सासुबाईला राग आला , बांधून ठेवले खांबाला 
  पांडूरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला     !!९!!

  सखुबाईची भक्ती पाहूनी, संकट पडले विठोबाला
  रूप घेवूनी सखुबाईचे , श्रीहरी तेथे आला
  पांडुरंगने बांधून घेतले, मोकळे  केले सखुबाईला
  पांडूरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला     !!९!!

  सावत्याची भाजी खूडू , लागला श्रीविठ्ठला
  पोटफाडाया सावत्याला , लावीलेसी विठ्ठला
  सावत्याच्या पोटामध्ये बैसला श्रीविठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला , हरी ओम विठ्ठला     !!१०!!

  गोरा कुंभार माती तूडवी , मुखी नाम विठ्ठला
  माती तूडवूनी मडकी घडवी , मुखात नाम विठ्ठला
  गोरोबाची भक्ती पाहूनी , पावला श्रीविठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला हरी , ओम विठ्ठला     !!११!!

  श्रीहरी गोविंद विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  केशव माधव विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  सिताराम विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला

  पांडूरंग विठ्ठला , हरी ओम विठ्ठला
  विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला