विजय पताका श्रीरामाची , झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी , आले प्रभु आले मंदिरी !!धॄ!! गुलाल उधळीत नगर रंगले भक्त जनांचे थवे नाचले राम भक्तिचा गंध दरवळे गुढ्या तोरणे घरोघरी ग घरोघरी प्रभु आले मंदिरी , आले प्रभु आले मंदिरी !!१!! आला राजा अयोध्येचा , अयोध्येचा सडा शिंपला प्राजक्ताचा , प्राजक्ताचा सनई गाते मंजूळ गाणी आरती ओवाळिती नारी प्रभू आले मंदिरी आले, प्रभु आले मंदिरी !!२!! श्रीरामाचा गजर होवूनी , गजर होवूनी पावन त्रिभूवन झुकते चरणी पावन त्रिभूवन झुकते चरणी भक्त रंगले गुणी गायनी भक्त रंगले गुणी गायनी भक्ती युगाची ललकारी ग ललकारी प्रभू आले मंदिरी , आले प्रभु आले मंदिरी !!३!!