पाहिला पाहिला नंदाचा नंदन 
  तेणे वेधियले तेणे वेधियले तेणे वेधियले मन      !!धॄ!!
  
  मोर मुकूट पितांबर 
  काळ्या घोंगडीचा भार
  तेणे वेधियले तेणे वेधियले तेणे वेधियले मन 
  पाहिला पाहिला नंदाचा नंदन !!१!!
  गोधन सारे आनंदे नाचत
  करी काला दही भात
  तेणे वेधियले तेणे वेधियले तेणे वेधियले मन
  पाहिला पाहिला नंदाचा नंदन !!२!!
  एका जनार्दनी लडीवाळ बाळ कान्हा
  गोपाळांशी खेळे कान्हा कुंजवनात
  तेणे वेधियले तेणे वेधियले तेणे वेधियले मन
  पाहिला पाहिला नंदाचा नंदन  !!३!!