माझे माहेर पंढरी !
  आहे भीवरेच्या तीरीं   !!१!!

  बाप आणि आई !
  माझी विठ्ठल रखुमाई   !!२!!

  पुंडलिक आहे बंधू !
  त्याची ख्याती काय सांगू   !!३!!

  माझी बहीण चंद्रभागा !
  करीतसे पाप भंगा    !!४!!

  एका जनार्दनीं शरण !
  करी माहेरची आठवण    !!५!!