किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला ग कान्हा आला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकूळ अवतरले गोड हसू गालात नाचू ,गावू तालात पैजण थरथरले कान्हा दिसतो उठून ,गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला मूर्ती अशी साजिरी ग , ओठांवरी बासरी , भुलले सुरांसंगती कुणी म्हणा गोविंद , कुणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती रोज खोड्या करून ,गोपबाळे जमून सांजसकाळी गोपाळकाला खेळ असा रंगला ग ,खेळणारा दंगला टिपरीवर टिपरी पडे लपुनछपुन गिरीधारी ,मारतो ग पिचकारी रंगाचे पडती सडे फेर धरती दिशा , धुंद झाली निशा रास रंगाच्या धारांत न्हाला