कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटिवर , पुतळा चैतन्याचा परब्रम्ह हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदरचा हा परमात्मा , वाली दामाजीचा