जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी , वागीश्वरी वागीश्वरी
ज्योत्स्नेपरी कांती तुझी ,ज्योत्स्नेपरी कांती तुझी
मुख रम्य शारद चंद्रमा ज्योत्स्नेपरी कांती तुझी,
मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी ,
उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा
तुझीया कृपेचे चांदणे, तुझीया कृपेचे चांदणे
नियमित वर्षु दे , नित वर्षु दे आमुच्या शिरी
वागीश्वरी ...!
वीणेवरी फिरता तुझी , वीणेवरी फिरता तुझी
चतुरा कलामय अंगुली ,चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे , संगीत जन्मा ये नवे
जडता मतीची भंगली
उन्मेश कल्प तरुवरी ,उन्मेश कल्प तरूवरी
बहरून आल्या मंजिरी, बहरून आल्या मंजिरी
वागेश्वरी... !!