हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची
  आवड तुला पानाची, बेलाच्या पानाची  !!धॄ!!

  गळ्यामध्ये रूद्राक्षांच्या माळा
  लावियले भस्म कपाळा
  आवड तुला बेलाची, आवड तुला पानाची
  बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा

  त्रिशूल डमरू हाती, संगे नाचे शिव पार्वती
  आवड तुला बेलाची, आवड तुला पानाची
  बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा

  भोले नाथा आलो तुमच्या द्वारी
  नाथ करी दया भक्तावरी
  आवड तुला बेलाची, आवड तुला पानाची
  बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा