गुरुदेवाचे स्मरण करूया ,
  दादादेवाचे स्मरण करुया
  मानसमंदिरीया
  आज ही पावन करू काया  !धॄ!

  औदूंबर तळी छायेखाली ,
  पद्मासनी ती मूर्ती बैसली
  अधोऀन्मिलीत नैत्र लावोनी ,
  आशिर्वद द्यावा
  आज ही पावन करू काया  !!१!!

  जटाजूट शिरी कंठी माळ ,
  हाती शोभतसे ती जपमाळ
  भस्म लेवूनी चंदन भाळी भक्तांवरी माया 
  आज ही पावन करू काया  !!२!!

  दिव्य मनोहर दर्शन ज्यांचे ,
  दीप तापहर मंगल साजे 
  लीन पदावर , भक्त जयांचे ,
  सुमनांजली वाहवया
  आज ही पावन करू काया  !!३!!