दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान झुकते हळूच दत्ताची पालखी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली झुळूक कोवळी चंदनासारखी साता जन्माचीही लाभली पुंण्यायी म्हणून जाहलो पालखीचे भोई शांत माया मुर्ती पहाटे सारखी वाट वळणाची जिवालाया ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळीयात गंगा जाहली बोलकी