देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा विठु राहे पंढरपुरी , वैकुंठच हे भूवरी भीमेच्या काठी डुले भक्तिचा मळा साजिरे रुप सुंदर ,कटि झळके पीतांबर कंठात तुळशीचे हार ,कस्तुरी- टिळा भजनात विठू डोलतो , कीर्तनी विठू नाचतो रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा