दादा राया आशीर्वाद दयावा , मज गरीबाला पदरात घ्यावा ।।धृ।।

  दुःख सांगु कुणाला जिवीचे ।
  घाव दावु कुणाला मनीचे ।।
  हिच इच्छा घडो जनसेवा ।।१।।

  नाव ऐकोनी धावत आलो ।
  दादा चरणांचा दास मी झालो ।।
  माझ्या हाकेला होकार दयावा ।।२।।

  नको मोटार नको घोडागाडी ।
  नको दौलत नको उंचमाडी ।।
  या दासाचा उद्धार करावा ।।३।।

  दादा दाता तर आम्ही भिकारी ।
  दादा चरणांचे आम्ही पुजारी ।।
  लाभो जन्मो जन्मी चरण सेवा ।।४।।