आज गोकुळात रंग खेळतो हरी ; राधिके ,जरा जपून जा तुझ्या घरी ! तो चटोर चित्तचोर वाट राखतो हात ओढुनी खुशाल रंग टाकतो रंगवून रंगुनी गुलाल फासतो सांगते अजूनही तुला परोपरी ! सांग श्यामसुंदरास काय जाहले ? रंग टाकल्याविना कुणा न सोडले ज्यास त्यास रंग रंग रंग लागले ! एकटीच वाचशील काय तू तरी ! त्या तिथे अनंगरंगरास रंगला गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला तो पहा मृदुंग मंजिऱ्यात वाजला माय ! वाजली फिरुन तीच बासरी